महिला दिन आज आचनक कॅलेंडर बघितलं, तर 8 मार्च "महिला दीन" whatsapp चालू केलं तर शुभेच्छा च शुभेच्छा. आता आज बरेच ठिकाणी events असतील, मोठेमोठे कार्यक्रम असतील खास महिला दीन साजरा करण्यासाठी. खरंच हा एक च दिवस असतो का महिलांसाठी ??? घरात राहून घरकाम करणारी स्त्री, शेतात काम करून मजुरी करणारी स्त्री, स्वतःच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी छोटी मोठी काम करणारी स्त्री, तर उच्च पदावर स्वतःच्या कर्तुत्वाने यशाचं शिखर गाठलेली स्त्री. सगळ्यांना नेहमीच समाजाकडून एक च गोष्ट हवी असते आणि ती म्हणजे RESPECT. मग फक्त 8 मार्चला महिला दिनानिमत्त शुभेच्या देवून किंवा आदरसत्कार करून त्या होतील का खूष. स्त्री म्हणजे नक्की काय?? " असंख्य वेदना सहन करून, एका गोंडस बाळाला जन्म देते ती म्हणजे स्त्री." " जिला आपण आपल्या घरात नेहमी रागावून बोलतो, किंवा तुला काही कळत नाही असं बोलतो, जिला घराच्या मह...