Most important Person ❤
आई
काय ग आई तुला ना काही समजतच नाही सारखी काय मागेमागे करतेस. प्रत्येक गोष्टीला नकार असतो तुझा, हे करू नकोस अस करू नकोस नककी करायच तरी काय मी??
मला शिकवलच का एवढं जर सगल तुझ्या मनासारख मी करायच होत तर... अग आई जग कुठ चाललाय आणि तू मात्र किती मागे आहेस अजून,जरा बाहेर पडून बघ life enjoy कर, बघ किती छान वाटत ते...
निशाची आईच्या मागे भूणभूण चालूच होती.
निशा एका उच्च महाविद्यालयात पदवीच शिक्षण घेत होती. लहाणपणापासूनच हुशार,.खेलकर, हजरजबाबी अशी तिची ओलख होती. एका छोट्याशी 1 BHK फ्लँटमध्ये ति तीच्या आई-बाबा बरोबर राहत असे. निशा तशी मनाने खूप प्रेमल पण तिला राग मात्र लगेच येत असे. आईवर तिचा फार जीव, आईशी ती सगल share करायची, पण जर राग आला तर आईला खूप बोलायची. बोलून झाल्यावर तिला खूप वाईट वाटायच की अरे आज आपण अस नाही बोलायला हव होत. आज आईला sorry बोलूयात पण नाही माफी मागण्यात तिला खूप कमी पणा वाटायचा. भावना व्यक्त करणे हे तिला कधी नीट जमलच नाही. आईवर किती राग आहे हे नेहमी तावातावाने बोलून दाखवणार पण त्याच आईवर किती प्रेम आहे हे कधी नाही सांगणार.
निशाची आईही एकदम साधी संस्कारी, मनमिलाऊ बाई... कोणी कितीही बोलले तरी शांत ऐकून घेणार... निशाला पण तिच सवय आईसाहेब काही बोलत नाहीत मग ही आपला सगला राग आईवर काढणार.. पण आईचा मात्र निशावर फार जीव. निशा कितीही काही बोलली तरी ऐकणार आणि थोडावेल रागवून सोडून देणार.
एकदा निशाच्या काँलेजमध्ये Annual function चालू होत. सगलीकडे नुसती मज्जा मस्ती धमाल. नवनवीन कपडे घालायचे , नटायचे आणि काँलेजवर जायच, फिरायच फूल आठवडा एकदम मस्त चालू होता.. त्यातच Freshers Event आला.
एक एक fresher स्टेजवर येवून त्यांचा performance देत होते. कोणी डान्स, कोणी गाणी तर कोणी नाटक सादर करत होते.सगल एकदम मस्त चालू होत; आणि आता आली होती निकालाची खरी वेल कोण होणार Mr. And Miss Fresher.. ?? सगल्या मूलांमधून 6 जण निवडली गेली त्यांच्या performance च्या basis वर, आता एकेकाला समोर बोलवून question विचारात होते. जो किंवा जी सगल्यात best उत्तर देईल ती आणि तो होणार काँलेजचा Mr. And Miss Fresher..
आता नंबर होता सुशांत चा, सुशांत 1st year चा student. दिसायला एकदम स्मार्ट, अभ्यासातही तितकाच हुशार . तो स्टेजवर आला तसा फूल काँलेजमध्ये जल्लोश... सगलीकडे टाल्या, शिट्या...
त्याला प्रश्न विचारण्यात आला...
" तूला कोणासारख बनायला आवडेल? तुझ Idol कोण??"
तो लगेच बोला "माझी आई".. माझी आई आहे माझी Idol.., तिने खूप कष्ट सहन करून मला वाढवल. आज मी इथपर्यत पोहचलो ते तिच्याचमुल. आज आई नसती तर मी नसतो. ति खूप प्रेमल आणि मनमिलाऊ. सगल्यांशी चांगल कस वागायच , कस बोलायच, काय वाईट काय चांगल हे मला तिनेच शिकवल.
सुशांत non-stop बोलत होता, बोलता बोलता तो खूप emotional झाला.. आणि रडू लागला. सगलीकडे खूप शांतता पसरली होती. कोणालाच कलत नव्हते की नक्की सुशांतला काय झाले, तेवढ्यात तो बोलला " आज माझी आई ह्या जगात नाही, ती मला सोडून गेली कायमचीच."
सगल्याना सुशांतच्या रडण्याचा अर्थ समजला होता. निशा मात्र हे सगल ऐकून एकदम स्तब्ध झाली. तिला काय बोलाव काय कराव तेच सुचेना, तिच्यासमोरून सगली चित्र एक एक करून जावू लागली आपण आपल्या आईला किती घालूनपाडून बोलतो सगल आठवल ति तशीच घरी गेली आणि गेल्यागेल्या आईच्या गल्यात पडून खूप रडली, आईला तर काही कलेचना नक्की हिला काय होतय .. निशा आईला म्हणाली...
"आई खरच sorry गं, मी तुला खूप काहीही बोलते ना मी परत नाही अस वागणार तू मला माफ कर, माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे ग आई... I Love You... प्लीज तू मला नको सोडून जावूस कधी... तुझ्याशिवाय life मी imagine च नाही करू शकत ... "
आईला ही खूप छान वाटल... आणि निशाला आपली चुक कलाली.
डॉ. निशिगंधा जाधव.
(खरच मित्रानों जोपर्यत आई-वडील आहेत त्यांची कदर करायला शिका, कारण आई-वडीलांची जागा कोणीच नाही घेवू शकत. अस नाही की आई वडील नेहमी बरोबरच असतात.. पण त्यांच्या चूका त्यांना शांतपणे सांगा ते नक्की समजतील.. आवाज वाढवून वाद घालून काहीही नाहि भेटत. तुम्ही कितीही रागवला तरी ते ऐकून घेतात कारण त्यांच तुमच्यावर प्रेम आहे. त्यामुले कधीच कोणासाठीहि आई-वडीलांना लांब करू नका.
शुध्दलेखनाच्या चुका माफ कराव्यात.)
Comments
Post a Comment