Posts

Showing posts from March, 2020

संसार सुखाचा....😐

संसार सुखाचा.....                मीना आणि राजेश च love marriage.. दोघांच एकमेकांवर खूप प्रेम, घरी आई-वडीलांचा लग्नाला नकार होताच. पण तरीही दोघांनी घरच्यांच मनपरिवर्तन केल. आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या सुखी संसाराला सुरूवात झाली.               जशी लग्नानंतरची पहिली दोन-तीन वर्ष एकदम मस्त जातात, एकमेकांना समजून घेण्यात, प्रेम करण्यात, रुसवा-फुगवा घालवण्यात तसाच ह्यांचाही संसार छान चालू होता. लग्नानंतर दोनच वर्षात त्यांना एक गोंडस मुलगा झाला. सगळं एकदम मस्त चालू होत. राजेश त्याच्या कामात जास्तीत जास्त व्यस्त राहू लागला. तर मीना मुलाचा सांभाळ करण्यात. दोघांनाही एकमेकांसाठी फार time च देता येत नव्हता.. थोडफार बोलन होत होत तेवढच.. राजेशला खूप वाटायच मीना सोबत वेळ घालवावा पण ती खूप busy...दिवसभरात थोडाफारच एकमेकांचा संवाद...             राजेश कामात जास्त व्यस्त राहू लागला. तो स्वतःला घरापासून लांब ठेवू लागला. घरीही तो कधी वेळेवर येत नसे. रात्री-बेरात्री बाहेर राहण वाढल... मीना...

women's day

महिला दिन            आज आचनक कॅलेंडर बघितलं, तर 8 मार्च "महिला दीन" whatsapp चालू केलं तर शुभेच्छा च शुभेच्छा. आता आज बरेच ठिकाणी events असतील, मोठेमोठे कार्यक्रम असतील खास महिला दीन साजरा करण्यासाठी.             खरंच हा एक च दिवस असतो का महिलांसाठी ???             घरात राहून घरकाम करणारी स्त्री, शेतात काम करून मजुरी करणारी स्त्री, स्वतःच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी छोटी मोठी काम करणारी स्त्री, तर उच्च पदावर   स्वतःच्या कर्तुत्वाने यशाचं शिखर गाठलेली स्त्री. सगळ्यांना नेहमीच समाजाकडून एक च गोष्ट हवी असते आणि ती म्हणजे RESPECT.  मग फक्त 8 मार्चला महिला दिनानिमत्त शुभेच्या देवून किंवा आदरसत्कार करून त्या होतील का खूष.              स्त्री म्हणजे नक्की काय??     " असंख्य वेदना सहन करून, एका गोंडस बाळाला जन्म देते ती म्हणजे स्त्री."     " जिला आपण आपल्या घरात नेहमी रागावून बोलतो, किंवा तुला काही कळत नाही असं बोलतो, जिला घराच्या मह...

what if God will go on holiday??

What if God will go on holiday...??   सुट्टी !!! म्हणजे मजा, मस्ती,गंमत, फूल टू धमाल. आठवडाभर शाला काँलेज झाल की येणारा तो आपला आवडता रविवार किती आनंद देतो बरं.. तसेच उन्हाल्याची व दिवाली ची सुट्टी म्हणजे तर काय फूल मजाच्! आपण किती वेगवेगले planning करतो ना...        पण कधी असा विचार केला आहे का, की जर देव च सुट्टी वर गेला तर काय होइल. या फक्त विचारानीच अंगावर शाहरा येतो ना??  "देव आणि तो पण सुट्टी वर..."          मानव म्हणजे या पृथ्वीतलावरची सगल्यात सुदंर अनुभूती, पण या मानवाला तयार केल ते या देवानीच. हा सुदंर निसर्ग, अफाट समुद्र, प्राणी पक्षी झाडे हे भले मोठे डोंगर तयार करणारा निर्माताच जर सुट्टीवर गेला तर, काय मग या पृथ्वी वर सगली धांदलच उडेल ना?            आई एक दिवस जरी घरात नसली तरी किती अवघड होत आपला सगला दिनक्रमच बदलतो... मग आपल्या या देवाकडे तर सगल जग सुरक्षित चालवण्याच्या चाव्या आहेत आणि तोच जर सुट्टी वर गेला तर काय होईल याचा विचारच करवत नाही ना???         ...

Most important Person ❤

                                आई         काय ग आई तुला ना काही समजतच नाही सारखी काय मागेमागे करतेस. प्रत्येक गोष्टीला नकार असतो तुझा, हे करू नकोस अस करू नकोस नककी करायच तरी काय मी?? मला शिकवलच का एवढं जर सगल तुझ्या  मनासारख मी करायच होत तर... अग आई जग कुठ चाललाय आणि तू मात्र किती मागे आहेस अजून,जरा बाहेर पडून बघ life enjoy कर, बघ किती छान वाटत ते...  निशाची आईच्या मागे भूणभूण चालूच होती.        निशा एका उच्च महाविद्यालयात पदवीच शिक्षण घेत होती. लहाणपणापासूनच हुशार,.खेलकर, हजरजबाबी अशी तिची ओलख होती. एका छोट्याशी 1 BHK फ्लँटमध्ये ति तीच्या आई-बाबा बरोबर राहत असे. निशा तशी मनाने खूप प्रेमल पण तिला राग मात्र लगेच येत असे. आईवर तिचा फार जीव, आईशी ती सगल share  करायची, पण जर राग आला तर आईला खूप बोलायची. बोलून झाल्यावर तिला खूप वाईट वाटायच की अरे आज आपण अस नाही बोलायला हव होत. आज आईला sorry बोलूयात पण नाही माफी मागण्यात तिला खूप कमी पणा वाटायचा. भावना व्यक्त...