women's day

महिला दिन

           आज आचनक कॅलेंडर बघितलं, तर 8 मार्च "महिला दीन" whatsapp चालू केलं तर शुभेच्छा च शुभेच्छा. आता आज बरेच ठिकाणी events असतील, मोठेमोठे कार्यक्रम असतील खास महिला दीन साजरा करण्यासाठी.
            खरंच हा एक च दिवस असतो का महिलांसाठी ???
            घरात राहून घरकाम करणारी स्त्री, शेतात काम करून मजुरी करणारी स्त्री, स्वतःच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी छोटी मोठी काम करणारी स्त्री, तर उच्च पदावर   स्वतःच्या कर्तुत्वाने यशाचं शिखर गाठलेली स्त्री. सगळ्यांना नेहमीच समाजाकडून एक च गोष्ट हवी असते आणि ती म्हणजे RESPECT. 
मग फक्त 8 मार्चला महिला दिनानिमत्त शुभेच्या देवून किंवा आदरसत्कार करून त्या होतील का खूष.
             स्त्री म्हणजे नक्की काय??
    " असंख्य वेदना सहन करून, एका गोंडस बाळाला जन्म देते ती म्हणजे स्त्री."
    " जिला आपण आपल्या घरात नेहमी रागावून बोलतो, किंवा तुला काही कळत नाही असं बोलतो, जिला घराच्या महतावाच्या निर्णयांमध्ये सहभागी करून घेत नाही, तरीही ती आपल्या साठी सगळी काम हसतमुखाने करते , ती म्हणजे स्त्री."
     " नोकरी आणि कामावरून आल्यावर, आपला सगळा थकवा आपल्या मुलांना बघून विसरणारी  आणि स्वयंपाकाला लागणारी स्त्री."
     " घरातला कर्तापुरूष  गेल्यावर, स्वतः कितीही हतबल झाली तरी ही हसून घराची जबाबदारी उचलणारी स्त्री."
      "लहान असताना आपल्या भावासाठी 🍫 शेअर करणारी छोटी मुलगी ते लग्नानंतर मला प्रॉपर्टी मधल काही नको फक्त माहेर हाव अस बोलणारी स्त्री."
         जेवडी सांगेल तेवडी कमीच पडतील ऐवडी उदाहरणे आहेत देण्यासारखी.
          आताच्या युगात महीलास्सुद्धा पुरुषांबरोबर सगळ्याच क्षेत्रात स्वतःचा पाय रोवून आहेत. त्यांनीही यशाचं उच्च शिखर गाठलाय. 
           तर दुसरीकडे त्याच महिला बलात्कार, हुंडाबळी, एसिड अटॅक, ऐवडच नाही तर भर चौकात  जिवंत जाळणे ह्या आमनुष कृत्याला बळी पडत आहेत. 
          प्रत्येकाने महिला दिना निमित्त एक निर्णय घेवूयात, सगळ्यांनी मिळून आपल्या घरातील प्रत्येक महिलेचा मग ती मुलगी असो, बहीण असो, आई, आजी, बायको, नणंद कोणीही असो तिचा आदर करूयात. तिच्या वाटचालीत तिला मदत करूयात. कोणतीही मुलगी जेव्हा रात्री_ आपरत्री एकटी रस्त्यावर असेल तर तिला सुरक्षित वाटायला हवेच याची जबाबदारी घेवूयात. तरच खऱ्या अर्थाने आपण महिला दीन साजरा करू शकतो..
 
        सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..

                  Dr. Nishigandha Jadhav.
       

Comments