संसार सुखाचा....😐
संसार सुखाचा.....
मीना आणि राजेश च love marriage.. दोघांच एकमेकांवर खूप प्रेम, घरी आई-वडीलांचा लग्नाला नकार होताच. पण तरीही दोघांनी घरच्यांच मनपरिवर्तन केल. आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या सुखी संसाराला सुरूवात झाली.
जशी लग्नानंतरची पहिली दोन-तीन वर्ष एकदम मस्त जातात, एकमेकांना समजून घेण्यात, प्रेम करण्यात, रुसवा-फुगवा घालवण्यात तसाच ह्यांचाही संसार छान चालू होता. लग्नानंतर दोनच वर्षात त्यांना एक गोंडस मुलगा झाला. सगळं एकदम मस्त चालू होत. राजेश त्याच्या कामात जास्तीत जास्त व्यस्त राहू लागला. तर मीना मुलाचा सांभाळ करण्यात. दोघांनाही एकमेकांसाठी फार time च देता येत नव्हता.. थोडफार बोलन होत होत तेवढच.. राजेशला खूप वाटायच मीना सोबत वेळ घालवावा पण ती खूप busy...दिवसभरात थोडाफारच एकमेकांचा संवाद...
राजेश कामात जास्त व्यस्त राहू लागला. तो स्वतःला घरापासून लांब ठेवू लागला. घरीही तो कधी वेळेवर येत नसे. रात्री-बेरात्री बाहेर राहण वाढल... मीनाची मात्र मग खूप चीडचीड व्हायची. एकत्रर हा दिवसभर घरात नसतो आणि असला तरी फोनवरच जास्त.. छोट्याछोट्या कारणावरून वाद होवू लागले. एकदिवस झाला की दुस-या दिवशी आहेच काहीतरी.
मीनाला मात्र राजेशच्या वागण्यावरुन त्याचा doubt येवू लागला., पण राजेशला direct कस विचारायच हेच तिला कळेना. मग ती गुपचूप राजेश चा फोन check करण्याचा प्रयत्न करू लागली. पण काय फोनला पण password.
एकेदिवशी राजेश आंघोळीला गेला असताना त्याचा फोन वाजला.. फोन बराच वेळ वाजत होता म्हणून मीनानी उचलला.. तर पलिकडून तिला एका बाईचा आवाज आला.. पण मीनाचा आवाज ऐकून फोन मात्र cut झाला होता.
मीनाच्या मनात परत शंकेची पाल चुकचुकली... तिने त्याबद्दल राजेशला विचारल.
मीनाः- अहो तुमचा फोन खूप वेळ झाल वाजत
होता म्हणून मी उचलला कोणीतरी
मुलगी बोलत होती पण माझा आवाज
ऐकताच फोन cut केला.. कोण होती
ती??
राजेश मात्र कावराबावरा झाला.. तो लगेच रागात बोला.
राजेशः- अग wrong number असेल. उगाच
माझ्या फोनला कशाला हात
लावतेस... नको ते उद्योग तुला., तुझ
तू काम कर.
मीना ची शंका अजूनच पक्की झाली. त्यात दुसर्या आठवड्यात अजून एक प्रकार घडला.राजेशच्या फोनवर एक message आला. आणि फोन नेमका open असल्यामुले मीनानी तो msg वाचला.
Hey dear where r you?
When we will meet?
मीनानी राजेशला msg दाखवून विचारले.
मीनाः- राजेश हा msg कोणाचा आहे. ह्या
unknown no. वरून तुला sms
कसा काय आलाय.
असे एक नाही अनेक वेळा राजेश मीनाला सापडत होता., पण तो नेहमीच उडवाउडवीची उत्तर देई.
एकदा मीना तीच्या मैत्रीणींसोबत हाँटेलमध्ये गेली होती, आणि अचानक तिला राजेश दिसला एका मुलीबरोबर हातात हात घालून बसलेला. तिचा आता मात्र राग अनावर झाला. ती लगेच उठून गेली त्याच्याकडे.
मीनाः- राजेश, तू आँफिसच्या time मध्ये इथ
काय करत आहेस आणि हि मुलगी
कोण, तिचा आणि तुझा काय संबंध?? मीनाला बघून राजेश दोन मिनीट घाबरतोच, परत स्वतःला सावरून तो म्हणतो.
राजेशः- तू ईथे काय करतेस तुझा काय संबंध
मला हे सगळं विचारण्याचा.
मीनाः- काय संबंध म्हणजे, मी बायको आहे
तुझी लग्नाची, तुझी काय नाटक चालूत
मला कलायलाच पाहिजेत.
राजेशः- हो बरोबर तुला कलायलाच हव.. ऐक
हि मनिषा, आणि आमच एकमेकांवर
प्रेम आहे.
मीनाः- काय बोलत आहेस आपल्याला एक
मुलगा आहे हे पण विसरलास का तू?
राजेशः- मी काही नाही विसरलो, तू विसरलीस
तुला नवरा आहे ते., घर, स्वयंपाक,
मुलगा यांच्यामधून तूला माझ्यासाठी
कधी time च नाही भेटला. जरा कधी
बोलाव म्हणल की तुझ काम चालूच.
मला पूर्णपणे गृहित धरलस आणि
विसरून गेलीस. जेव्हा मला तुझ्या
सोबतीची खरी गरज होती तेव्हा तू
नव्हतीस, त्यावेलेस मनिषानी मला
साथ दिली, तिची सोबत मला आवडू
लागली. हे सगळं मी तुला सांगणारच
होतो पण तुला सगळं अस आणि
चूकिच्या पध्दतीने कळलं.
मीनाला काय बोलाव हेच कळेना, तिला खूप राग येत होता तसच खूप रडूही वाटत होत.
मीनाः- राजेश, एकदा माझ्याशी बोलून तर
बघायचस.. असा कसा वागू शकतोस
तू? मी चुकली असेल आहे मला मान्य
पण तु माझ्याशी चर्चाच नाही केलीस
कधी बोलून पण नाही दाखवलस...
atleast एकदा मला सांगायच तरी कि
मी चूकतीय.. जा तू परत कधीच येवू
नकोस.. मला आणि माझ्या मुलाला
तोंडपण दाखवू नकोस.
मीना निघून जाते, तिच्या पाठमोर्या आकृतीकडे बघून राजेशला कळतच नव्हत आपण जे केल ते चूक कि बरोबर... पण आता वेळ निघून गेलेली असते. थोड्याच दिवसात त्यांचा divorce पण होतो.
अशाप्रकारे एक संसार जो प्रेमाने, विश्वासाने सुरू झाला होता... तो आता कायमचा संपला.
डाँ. निशिगंधा जाधव.
(कथा पूर्णतः काल्पनिक आहे. तुम्हाला काय वाटत ह्यात चुकीच कोण राजेश कि मीना?? राजेश चुकला कारण त्यानी मीना ला गृहीत धरल., तिला नीट समजू नाही शकला.. त्यानी तिच्याशी संवाद करायला हवा होता. तिला तिच्या चूका दाखवून द्यायला हव्या होत्या. पण राजेशनी तर बाहेर आपला आनंद शोधायचा प्रयत्न केला.
मीना चुकली कारण तिने मुल, घर यांकडे जास्त लक्ष दिल. राजेशला time द्यायला ती विसरली.. आणि तीनेही राजेशला गृहीत धरल.
हे relation तुटण्यात दोघांचीही तेवढीच चूक आहे... तुम्हाला काय वाटत ते comment मध्ये नक्की कळवा.)
Comments
Post a Comment