what if God will go on holiday??

What if God will go on holiday...??

  सुट्टी !!! म्हणजे मजा, मस्ती,गंमत, फूल टू धमाल. आठवडाभर शाला काँलेज झाल की येणारा तो आपला आवडता रविवार किती आनंद देतो बरं.. तसेच उन्हाल्याची व दिवाली ची सुट्टी म्हणजे तर काय फूल मजाच्! आपण किती वेगवेगले planning करतो ना... 
      पण कधी असा विचार केला आहे का, की जर देव च सुट्टी वर गेला तर काय होइल. या फक्त विचारानीच अंगावर शाहरा येतो ना?? 
"देव आणि तो पण सुट्टी वर..."
         मानव म्हणजे या पृथ्वीतलावरची सगल्यात सुदंर अनुभूती, पण या मानवाला तयार केल ते या देवानीच. हा सुदंर निसर्ग, अफाट समुद्र, प्राणी पक्षी झाडे हे भले मोठे डोंगर तयार करणारा निर्माताच जर सुट्टीवर गेला तर, काय मग या पृथ्वी वर सगली धांदलच उडेल ना? 
          आई एक दिवस जरी घरात नसली तरी किती अवघड होत आपला सगला दिनक्रमच बदलतो... मग आपल्या या देवाकडे तर सगल जग सुरक्षित चालवण्याच्या चाव्या आहेत आणि तोच जर सुट्टी वर गेला तर काय होईल याचा विचारच करवत नाही ना???
         देव जर सुट्टी वर गेला तर लोकांच्या मनातील श्रद्धा, भक्ति, विश्वास या भावनाच जगातून नष्ट होतील. भष्टाचार,हिंसा,क्रोध या अयोग्य भावनांना वाव मिलेल, आणि सत्य, पुण्य, योग्य या शद्बाचे अर्थच बदलतील. सद्धयाही या जगात अनेक नास्तिक लोक आहेत पण आस्तिक लोकांमुले देवाच स्थान अगदीच वर आहे पण आता जर देव मानवाच्या अंर्तमनातून निघून गेला तर या जगात चांगला हा शद्ब कुठे ऐकूच येणार नाही.
     आपण जन्मल्यापासून ते शेवटपयर्त आपल्या आयुष्यात काय काय घडत ते देवाने अधीच लिहून ठेवलेलं असत असं म्हणतात मग जर देवच सुट्टी वर गेलातर आपल्या आयुष्यातील घडामोडी कोण लिहणार मग आपल आयुष्य अगदी थांबूनच जाईल नाही का??
        माझ गाव वाई म्हणजे दक्षिणकाक्षी... दक्षिणकाक्षी म्हणून ओलखल्या जणार्या वाईतील मंदिरातून जर देवच निघून गेला तर लोकांची काय धांदल उडेल. सकाली होणारया त्या आरत्या,भजन काहि कानावर पडणार नाही. आपण कितीही घाईत असलो तरी कुठ मंदिर दिसल की आपले हात आपोआप जोडले जातात आता देवच नाही तर कोणाच्या पाया पडणार हा मोठा प्रश्न च आहे. खरच सगल अगदी हरवून गेल्यासारख वाटेल ना?
        देवाने हा  निसर्ग निर्माण केला , त्याला अगदी सुदंर बनविल पण जर हा देवच निघून गेला तर त्याच्याबरोबर हा निसर्ग तर नष्ट नाही ना होणार  असे वाटत.. जर या निसर्गातील पाणी, झाडे, वेली नष्ट झाली तर मानवाने खायचे काय तो जगणार कसा हा question च आहे. सगल्या गोष्टीतच अडथले येणार.. अस म्हणतात की देवच वरती जोडया बनवतो मग देव नाही म्हणलावर लोकांची लग्न कशी होणार.
        आपलाला एखादा problem आला की आपण लगेच देवाला answer विचारतो.. आणि तो कधी कसा आपला problem सोडवतो.. हे आपलाला समजत देखील नाही. देवाला एखादा question विचारून बघा मनापासून answer  नककी भेटेल.. जर हा देवच निघून गेला तर question कोणाला विचारायचे आणि answer ही कोणाकडून मिलणार हा मोठा  प्रश्नच आहे.
         देवच निघून गेला तर आपण आपल्या मनातील भावना कोणाकडे प्रकट करणार. अशा कितीतरी शंका किंवा विचार, चिंता असतात ज्या आपण कोणाबरोबर ही नाही share करू शकत पण आपण देवाला मात्र सगल नककी सांगतो कारण आपला देवावर विश्वास आहे.. तो नसेल तर सगल मनातच राहीलं असत आणि त्याचा फार त्रास झाला असता.
         देव निघून गेला तर आपण त्याचाबदद्ल असलेली भक्ति, प्रेम,आस्था कोणाकडे प्रकट करणार. आठवडयातून एकदा उपवास कोणासाठी धरणार बर आणि मोठ्या श्रद्धेने, भावनेने दान कोणाला बर देणार. म्हणूनच मला अस वाटत की देव सुट्टीवर नको जायला. कारण देव आपल्या साठी important आहे... आणि आपल्याला त्याची खूप गरज आहे.10 दिवस असलेला गणपती बाप्पा जेव्हा विसर्जीत  करतो तेव्हा किती मन भरून येते ना.. पण आपल्याला माहीत असत तो पुढच्या वर्षी लवकर येइल. आपल वर्षच त्याची वाट बघण्यात निघून जात.. आणि बाप्पा आला रे आला की मग काय मजाच मजा.
       देवबप्पा स्वतातरी नाही विचार करणार आपल्याला सोडून सुट्टी वर जायचा... पण आपण ही आपली वागणूक नीट ठेवायला हवी. निसर्गाची नीट कालजी घ्यायला हवी म्हणजे देव कायम आपल्यात राहीलच... कारण त्याला आपली खूप कालजी आहे म्हणून तो तर नाही जाणार आणि आपणही त्याला नकोच जावून द्यायला सुट्टीवर...
कु. निशिगंधा दिलीप जाधव. 

(लेख आवडल्यास like, comment and share करा. कृपया शुध्दलेखनाच्या चुका माफ कराव्यात.)

Comments

Post a Comment